| |
काही दिवसांपूर्वी आमचा शाळेतला मित्र मैत्रिणींचा ग्रुप एकत्र जमला होता प्रत्येकाचं सघ्या काय चाललं आहे याविषयी चर्चा सुरू होती.
अनेकांच्या बोलण्यात येत होतं की सदयाच्या रिसेशनमुळे खूपच प्रश्न निर्माण झाले आहेत रिसेशनची चर्चा खूप रंगल्यावर मी गंमतीनी म्हटले, ' आमच्या काऊन्सलिंगच्या क्षेत्रात मात्र रिसेशन अजिबात जाणवत नाही, बाहेरच्या रिसेशनमुळे उलट आमचं काम फारच वाढलं आहे !'
यातला विनोदाचा भाग मोडला तरी हे नक्की सांगता येईल की काऊन्सलिंगसाठी येणाचा लोकांच्या संख्येत दिवसंदिवस वाढ होताना दिसते आहे.
वाठते ताण-तणाव, स्पर्धा, आर्थिक मंदीमुळे आलेली असुरक्षितता, कमी क्यात धेतलेल्या स्वच्छानिवृत्तीमुळे जाणवणारा रिकामेपणा या सर्व प्रश्नांमुळे काऊन्सलर कडे अनेक लोक येत असतात.
पूर्वी एखादया कारणासाठी काऊन्सलरकडे किंवा मानसोपचारतज्ञा कडे जा असं कुणाला सुचवल की तिकडे जायला मी काय वेडा जाल्ये आहे का? अशी प्रतिक्रीया असे पण सध्या छोटया प्रश्नांसाठीही काऊन्सलिंगचा उपयोग होऊ शकतो, ही जागरूकता वाढली आहे.
अनेक लोक वैयक्तिक पणे काऊन्सेलरकडे जातात, तसेच काही काऊन्सलर्स 'ताण-तणाव' , रोगावर नियंत्रण यासारख्या विषयावर धेत असलेल्या कार्यशाळानाही जात असतात.
काऊन्सलर कडे अगदी सर्व वयोगटातले लोक अनेक प्रकारच्या मदतीसाठी जातात लहान मुलांमधे आठळणारा अती चंचलपणा, मतीमंदत्त्व, थोडया मोठया मुलांमधे अभ्यासाचे टेन्शन, कुठला अभ्यासक्रम ध्यावा हे न समजणं यां सारख्या गोष्टीसाठी पालक त्यांना काऊन्सेलरकडे धेऊन जातात.
मुलं जेव्हा पौगडावस्धेत जातात तेव्हा होणाया शारिरीक बदलांमुळे किंवा वाठत्या वयानुसार बदलणाया भूमिका स्वीकारता न आल्यामुळे अनेक प्रकारचे ताण निर्माण होतात या वयात योग्य मदत मिळाली नाही तर पुठच्या आयुष्याचं नुकसान होऊ शकतं या वयांत किंवा अजून मोठयावयातही व्यसना बद्दलच्या अनेक गैरसमजांमुळे व्यसन लागण्याची शक्सता असते या वयातल्या मुलांना कोणाचंही लेक्चर ऐकायचं नसतं त्यामुळे धरातल्या लोकांनी त्यांना उपदेश करत रहाण्यापेक्षा त्यांना काऊन्सेलर कडे नेल्यास प्रश्न सुटायला मदत होऊ शकते.
प्रौठावस्थेतल्या आणि वृध्दापकाळातल्या अनेक ताणासाठी काऊन्सेलरची मदत धेतली जाते.
आमच्याकडे एखादया गोष्टीच्या मार्गदर्शनासाठी जसे लोक येतात तसेच केवळ मन मोकळ करण्यासाठीही येतात मनावरचे ताण काही नकारात्मक विचार धरातल्या लोकांशी बोलायला अवधड वाटतातण् म्हणून त्त्याबद्दल काऊन्सेलरशी बोललं जातं कारण ऐकलेल्या गोष्टीबद्दल गोपनियता बाळबणं ही काऊन्सेलरची जवाबदारी असते.
'काऊन्सलिंग' म्हणजे नक्की काय? अशी अनेकांना उत्त्सुकता असते. आपण नेहमीच आपापल्या परीने इतरांना काऊन्सलिंग करतच असतो. आपला एखादा मित्र टेन्शनमघे असेल तर, 'तू टेन्शन धेऊ नकोस , आम्ही तुझ्या बरोबर आहोत, ' असा 'आधार' देतो. (पण नुसतं टेन्शन धेऊ नकोस किंवा दु:ख वाटून धेऊ नकोस, असं सांगून प्रश्न सुटत नाही. या आधारामुळे थोडावेळच बर वाटू शकत ) कोणी चुकीचं वागत असेल तर त्याचं वागणं त्त्यानी कस बदलांल पाहिजे याबद्दल 'उपदेश'आपण करत असतो.
पण 'आधार' , 'उपदेश' आणि शास्त्रशुद्ध काऊन्सेलिंग यात फरक आहे. आधार देताना त्त्या व्यक्तीची भावना बदलण्यावर लक्ष केंद्रीत केल जातं. उपदेशामधे व्यक्तीच्या वर्तनात म्हणजे वागण्यात बदल करण्याबद्दल सांगितलं जातं. काऊन्सलिंग मधे व्यक्तीचे चुकीचे विचार शोधून काढून ते बदलणं महत्त्वाचं मानलं जात कारण भावना किंवा वर्तन हे आपल्या विचारांमुळेच निर्माण होत असतात.
काऊन्सलिंग साठी आलेल्या व्यक्तीचे बोलणं काऊन्सेलर शांतपणे ऐकून धेतात प्रश्ने विचारून विचार समजुन धेतात आणि चर्चा करून प्रश्न सोडवण्यावाठी आवश्यक असलेले पर्याय शोधायला आणि त्यातील योग्य पर्याय निवडायला फक्त मदत करतात त्या व्यक्तीला उपदेश करणे, स्वत:च जास्त बोलणे, स्वत:चा निर्णय लादणे या गोष्टी चांगले काऊन्सेलर कधीच करत नाहीत.
गेल्या अनेक वर्ष मी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात काऊन्सेलर म्हणून काम करत आहे क्लिनिकल सायकॉलॉजी या विषयावर एम.ए. केल्यानंतर मी कामाला सुरूवात केल्यावर मला जाणवलं की माझ्याकडे पुस्तकी ज्ञान खूप आहे पण त्याचा प्रत्यक्ष रूग्णमित्रांशी बोलताना कसा उपयोग करायचा याच ज्ञान मात्र मला नहतं ते ज्ञान मला मुक्तांगण मधून च बरे होऊन काम करणाचा काऊन्सेलर्स कडून आणि माझी आई डॉ. अनिता अवचट यांच्याकडून मिळाल.
एक चांगला काऊन्सेलर कसा असावां याबाबतीत मी आईकडे क आदर्श म्हणून बधायचे. स्वत: मानसोपचारतज्ञ असूनही कमीतकमी औषध वापरून जास्त काऊन्सेलिंग करण्यावर तिचा भर होता. व्यसनी रूग्णाबद्दल तिला खूप कळकळ वाटायची अतिशय प्रेमानी त्यांच्याशी बोलायची. त्यांचा माणूस म्हणून आदर राखणं तिला महत्त्वाचं वाटायचं व्यसन हा आजार आहे म्हणूनच त्यांच्या कडून चुका होतात ते वाईट नाहीत, त्यांच व्यसन वाईट आहे, असा तिचा त्यांच्याबद्दलचा दृष्टीकोन होतात.
कुठल्याही रूग्णमित्राना काऊन्सेलरकडून अशाप्रकारे प्रेम, आदर मिळतो, समजून धेतल जात, तेव्हा ते खूप मोकळेपणाने त्यांच्याशी बोलतात.
आपल्या रूग्णमित्रांच्या प्रश्नामधे नेमक कितपत गुंतायचं, ही काऊन्सेलर्स पुढे एक असते. अजिबातच गुंतलो नाही नर आपण त्यांच्या प्रश्न समजून धेऊच शकणार नाही जास्तही गुंतायचं नाही, नाहीतर तटस्थपणे आपण त्यांना मदत करू शकणार नाही आपल्यालाही त्याचा त्रास होईल. म्हणून जरूरीपुरती भावनिक गुंतवणुक आवश्यक असतं. याला 'सहभावना' किवा 'एम्पथी' असं म्हटल जात.
काऊन्सेलर म्हणून काम करताना मला जाणवतं की मला खूप मानसिक समाधान या कामात मिळत. एखादी व्यक्ती अनेक प्रश्न धेऊन येते. खूप बोलते, आम्ही चर्चा करतो आणि परत जाताना त्यां व्यक्तीत झालेला बदल दिसून येतो. प्रत्येक वेळी प्रश्न सुटलेलाच असतो असं नाही पण त्या प्रश्नाकडे बधायचा त्यांचा दृष्टीकोण बदलतो आणि ताण हलका होतो.
अनेक व्यसनी व्यक्तीच्या पत्नी 'मुक्तांगण'मधे चौकशीसाठी येत असतात खूप वैतागलेल्या असतात, निराश असतात. आम्ही त्याचे बोलण शांतपणे ऐकून धेतो त्यांच्याच उदाहरणांचा आधार धेऊन व्यसन हा आजार आहे. हे समजावून सांगतो त्याबद्दलच्या उपायाची माहिती देतो. पतीला व्यसन सोडायला वेळ लागला तरीही त्या स्वत:त कसा बदल करू शकतात, राग, टेन्शन कमी करू शकतात, मुलांना चांगल्या प्रकारे वाढवू शकतात या बद्दल चर्चा करतो आणि केवळ अर्ध्या-पाऊण तासाच्या या चर्चेनंतर त्या खूप शांत होतात आत्मविश्वासाने धरी जातात.
मुक्तांगण मधून दर आठवडयाला व्यसनी मित्र बाहेर पडतात. चागल आयुष्य जगायला लागतात. अशा प्रकारचे बदल बधण्यामधे खूपच आनंद आहे.
मुक्तांगणच्या उपचार पध्दतीमधे आम्ही काऊन्सेलिंगला अतिशय महत्त्व देतो. आमच्याकडचे अनेक काऊन्सेलर्स पूर्वी व्यसनी म्हणून केंद्रात दाखल झाले. आता स्वत: बरे होऊन ते इतरांना मदत करतात त्यांनी याबाबतच खास प्रशिक्षण धेतलेल नाही पण व्यसनी मित्राविषयी कळकळ. त्याना समजुन धेण्याची तयारी, स्वत:चे अनुभव या गोष्टीमुळे ते चांगल्याप्रकारे काम करू शकतात.
हे सर्व असलं तरी प्रशिक्षण महत्त्वाचं आहेच. चांगल्या काऊन्सेलरचे आवश्यक गुण आणि योग्य प्रशिक्षण या दोन्ही गोष्टी असतील तर काऊन्सेलिंग जास्त प्रभावी होऊ शकत. म्हणून आमच्या सर्व काऊन्सेलर्स मुक्तांगणच्या प्रशिक्षण केंद्रात कोर्सेस दिले जातात.
ज्यांना काऊन्सेलिंग करियर करायची इच्छा आहे, त्याच्यासाठी महाराष्ट्रात अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत.
काऊन्सेलिंग हे विशेषत: मानसोपचारतज्ञ(Psychiatrist) मानसोपचारक(Psychologist)किंवा समाजसेवेचा अभ्यासक्रम केलेल्या व्यक्तीकडून केलं जातं.
त्या पैकी सायकीऍट्रीस्टलोकांनी वैधकीय पदवीनतंर सायकीऍट्री या विषयाची पदविका किंवा पदवी धेतलेली असते काऊन्सेलिंग बरोबरच ते औषधोपचारही करू शकतात.
सायकॉलॉजीस्ट होण्यासाठी मानसशास्त्र(सायकॉलॉजी) या विषयात एम.ए. करणे गरजेचे आहे.
या साठी सायकॉलॉजी या विषयात बी.ए. केलेल्यांनाच प्रवेश दिला जातो. जागा मर्यादित असल्यामुले गुणांप्रमाणे प्राध्यान्य दिले जाते. काऊन्सेलिंग सायकॉलॉजी हा विषय धेऊन एम.ए. करता येते. इथे मराठीतून शिकवलं जातं. परिक्षा मराठीतून किंवा इंग्रजीतून देता येते.
निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशलवर्क इथे मास्टर्स इन हयुमन डेव्हलपमेंट हा सायकॉजॉजी आणि सोशल वर्क यांचा समन्वय साधणाराही एक अभ्यासक्रम आहे.
महाराष्ट्रत अनेक ठिकाणी समाजसेवेच्या पदव्युतर अभ्यासक्रमाची सोय आहे. एम.ए. किंवा एम.एस.डब्ल्यू. केल्यानंतर काही काऊन्सेलिंगचे प्रमाणपत्र कोर्सेस करता येतात.
पदव्यूत्तर शिक्षण झाल्यानंतरही ज्यांना पुठे शिकायचे आहे, त्यांच्यासाठी महाराष्ट्राबाहेरही काही संधी आहेत. अशा प्रकारच्या शिक्षणनंतर पुठे अनेक गोष्टी करता येतात. अनेक हॉस्पिटल्स् मधे रूग्णांना मानसिक आधार देणे,त्यांच्या नातेवाईकांशी बोलणे या साठी काऊन्सेलर्सशी गरज असते.
शेवटी सांगावसं वाटतं की काऊन्सेलिंग हे खूप वेगळया प्रकारचं क्षेत्र आहे. कारण यामधे माणसाच्या मनाशी संबंध येतो आणि ही एक खूप अगम्य गोष्ट आहे. त्यामुळे काम करताना जसे समाधनाचे क्षण येतात, तसेच निराशेचेही येतात त्या सर्वातून शिकून पुढे जाणं, निराशेचा स्वत:च्या वैयक्तिक जीवनावंर प्रभाव पडू न देणं सतत नवीन शिकत रहाणं आणि मुख्य म्हणजे आपण रूग्ण मित्रांना जे करायला सांगतो ते आपणही आचरणात आणणं महत्त्वाये आहे. |
|